Nidra Kal भवानीमातेचा निद्राकाळ
Nidra Kal भवानीमातेचा निद्राकाळ तुळजाभवानीमातेचा वर्षातून तीनदा म्हणजेच 21 दिवस निद्राकाळ असतो. याकाळात तुळजाभवानी माता नीद्राकाळात जाते असे मानून तिची मूर्ती तिच्या स्थानावरून हलवून पलंगावर नउ दिवस झोपलेल्या अवस्थेत असते. या दिवसांसाठी खास पलंगही तयार केला जातो. तसेच याकाळत करायचे पूजावीधीही वेगळया प्रकारचे असतात. या काळात मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला जात नाही. याकाळात मूर्तीला तेल आणि अत्तराने मालिश केली जाते. जणू तिचा थकवा दूर करण्याचा हा एक प्रयास असतो. त्यानंतर देवीला महावस्त्र, साडी व पांघरूण घातले जाते. देवी निद्रा अवस्थेत असताना तिला फक्त नथ आणि डोळे इतकेच अलंकार घातले जातात. नंतर देवीचा मळवट भरून फुलांचा मुकुट चढवला जातो व पुष्पअलंकार घातले जातात. त्या नंतर देवीला नैवैद्य दाखवून धूपार्ती केली जाते. महिषासूरा बरोबर झालेले युद्ध हे नउ दिवसांचे होते. नउ दिवसाच्या युद्धाची सांगता ही मातेच्या विजयाने झाली आणि मातेने महिषासूराचा वध केला. पण जणू या नउ दिवसांच्या घोर अशा युद्धामुळे माता तुळजाभवानी अत्यंतिक थकली होती. या दिवसांचे प्रतिक म्हणून हे नवरात्र म्हणजेच नउ दिवसांची पूजाव...